DY Patil Group Page Image

Maratha Bhasha Divas

 मराठी भाषा गौरव दिन

 

 

'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. 'मराठी भाषा गौरव दिन' दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी २०१३ रोजी घेण्यात आला.

 

 

 

'राजभाषा मराठी दिन' हा मे रोजी साजरा करण्यात येतो. मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला.म्हणून १९९७ पासून मे हा दिवस 'राजभाषा मराठी दिन'म्हणून साजरा करण्यात यावा असा शासनाने निर्णय घेतला.दिनांक १० एप्रिल १९९७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. आम्ही आमच्या संस्थेमध्ये या दिनानिमित्त डॉ . डी  वाय पाटील इन्स्टिट्युट ऑफ फार्मसिचे प्राचार्य डॉ संजीव देशपांडे सर यांचे व्याख्यान आयोजित केले होते .

उपरोक्त कार्यक्रमाला अनुसरून सरांनी मुलांना  मराठी भाषा गौरव दिन का साजरा करतो त्यासंबधी माहिती दिली.  कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत असताना सरानी, विशाखा , गर्जा जयजयकार क्रांतीचा आणि तसेच नटसम्राट अशा विविध साहित्यिक कलाकृती त्यांच्याच लेखणीतून उतरलाय आहेत याची जाणीव करून दिली. त्यासोबतच पुस्तके हे तणाव कमी करण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात हे समजावता  सरांनी मुलांना पुस्तके हेच खरे मित्र या विषयावर मार्गदर्शन केले . सर्व गोष्टींनी प्रेरित होऊन  मुलांनाही त्यांच्यातील साहित्यिक गुणांना वाव मिळावा म्हणून रोज दैनंदिनी लिहावी असा सल्ला दिला.

 मुलांनी सरांच्या व्याख्यानाला भरभरून प्रतिसाद दिला .

 

 

 

           

Copyright © 2015  Dr. D.Y. Patil Educational Complex, Akurdi, Pune
Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+

:::| powered by dimakh consultants |:::